Ajay Kandewar,Wani:- मागील काही महिन्यांपासून वणी पोलीस ठाण्याला जस काही ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांवर कारवाई करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतः कारवाईच्या फांद्यात अडकत चालले आहेत. बदली व निलंबनाच्या कारवायांमुळे वणी पोलीस स्टेशन यवतमाळ जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली की, वणी येथे एका उचभ्रू वस्तीत वणी पोलीसांनी देहव्यवसाय चालत असलेल्या ठिकाणीं रेड केली असता ती कारवाई संशयाचा भोवऱ्यात सापडल्याची बोंब ऐकावयास मिळत आहे.
जानेवारीमध्ये वणी शहरात एका उच्चभ्रू वस्तीत देहव्यवसाय चालत असलेल्या ठिकाणीं वणी पोलीसांनी रेड केली असता, त्या रेड मध्ये तीन तरुण तर 2 महिलाही असल्याची चर्चा वाऱ्यसारखी पसरली होती. तसेच त्या घटनास्थळी अनेकांची गर्दी देखील जमली होती. काहींनी त्या उच्चभ्रू वस्तीचा एका फ्लॅट मधून त्या त्यांना काढत असताना व्हिडिओ देखील काढले. त्या व्हिडिओत त्या 2 महिला व 3 तरूण असल्याचंही आढळून आलें . त्यातील 2 महिलांना काहीही कारवाई न करतां सोडून दिले परंतु यातील दोन तरुण मुकुटबण येथील तर एक पिपरड येथील यावर वणी पोलीसांनी काहीं चिरीमिरी घेतं थातुरमातुर कारवाई करून सोडून दिले.कारण घडलेल्या या घटनेनंतर, वेश्याव्यवसायाविरुद्ध पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.अदखलपात्र (एनसी) श्रेणी वगळता पोलिस ठाण्यात दाखल केलेले सर्व खटले पोलिस विभागाच्या वेबसाइटवर प्रकाशित करतात.परंतु वरील घटनेची माहिती जाणूनबुजून पोलिस विभागाच्या वेबसाइटवर अपलोड न केल्याबद्दलही चर्चा आहे. यांकारवाई
•वणी शहरात वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे.
वणी शहरात बेकायदेशीर व्यवसायांसोबतच वेश्याव्यवसायही फोफावत आहे. शहरातील अनेक भागात किरायाचा घरांमध्ये आणि हॉटेलमध्ये अनैतिक कृत्ये सुरू असल्याची माहिती आहे. काही काळापूर्वी, शहरातील एका भाड्याच्या घरात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका महिलेला नागरिकांनी एका ग्राहकासह पकडले होते. पण त्यावेळीही पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता त्या महिलेला आणि ग्राहकाला सोडून दिले.