•कोंबड्यांवर विष प्रयोग ?
•संशयित विषयुक्त दाणे उघडणार “राज ”
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यांतील उकणी या गावातील विठ्ठल रासेकर यांचा शेतातील हजारो रू.किंमतीचे वेगवेगळ्या जातीचा कोंबड्यांना विष प्रयोग करून 50 चा वर कोंबड्याना मारल्याचा धक्कादायक प्रकार ता.4 सप्टें रोजी सकाळी उकनी या गावात घडल्याचे उघड झाले आहे.
या प्रकारणाने गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले.या गावातील पोलिस पाटील व वैद्यकिय अधिकारी यांनी पंचनामा करीत काही दाणे देखील तपासाकरीता नेले असल्याचे कळले आहे. विशेषतः त्या शेतात संशयित विषयुक्त दाणे सापडल्याने संशयाचे धागे दोरे वाढले आहे. परंतू या मुक्या पक्ष्यांनी “त्या” व्यक्तीचे काय वाकडे केलें असावे.. जर हा विषप्रयोग असेल तर तपासाअंती अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.