•ई-रिक्षाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना रोजगार निर्मितीसाठी निश्चितच मदत मिळेल – संघदीप भगत(माजी जि.प.सदस्य)
अजय कंडेवार,वणी :– गरजूंसाठी विशेष तळमळ…. आणि गोर गरिबांसाठी एका हाकेवर धाऊंनी जाणारे राजुर येथील विशेष व्यक्तीमत्व असलेले संघदीप भगत (माजी जि. प. सदस्य). असाच एक समाजोपयोगी विशेष पाठपुराव्याने राजूर येथीलच ज्ञानज्योती अपंग गट व एकता अपंग गट यांना जिल्हा परिषद यवतमाळ समाज कल्याण विभागामार्फत अपंग 5 टक्के सेस निधीमधून राजूर येथील 2 अपंग गटांना ई – रिक्षाचे लाभ मिळवून दिले.Inauguration ceremony of e-rickshaw..Through e-rickshaw, disabled people will definitely get help in creating employment – Sanghdeep Bhagat (former G.P. member).
किशोर गज्जलवार (गटविकास अधिकारी प. स. वणी ) व संघदीप भगत (माजी .जिल्हा परिषद ,सदस्य यवतमाळ) यांच्या शुभहस्ते ई-रिक्षाची चाबी त्यां लाभार्थ्यांना देत ई – रिक्षाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी प्रणिता मो.असलम (माजी.सरपंच), निलेश सवंत्सरे, प्रवीण कडुकर, मिलमिले ,दिशा पाटील.अंजुषा लोहकरे,पुष्पलता महतो,कांचन वानखेडे यांची उपस्थिती होती.