•विद्यार्थी,पालक व शिक्षकवृंदानी मानले आभार.
अजय कंडेवार,वणी :- विद्यार्थी,पालक व शिक्षकवृंद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांची भेट घेऊन मोहोर्ली, विरकुंड व बोर्डा या मार्गावर चालणारी एस.टी.महामंडळाचे बस वेळेवर निश्चित करुन द्यावी,अशी मागणी केली होती. ती लगेच पुर्ण देखील करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांसमवेत वणी येथील एस.टी. महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाची भेट घेऊन या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस फेरी चालू करण्याकरिता भेट दिली. तसेच इरशाद खान यांनी एसटी महामंडळाच्या प्रमुखाला दम दिला की, जर बस सेवा चालवण्यास दिरंगाई होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना राजुभाऊ उंबरकर यांच्या आशिर्वादाने एसटी महामंडळाचा कारभार हाती घेण्यास सक्षम आहे अशी जोरदार तंबी सुद्धा आगार प्रमुखांना दिली. तंबी देताच “बस फेऱ्या” विद्यार्थ्यांना वेळेवर होईल असे आश्वासनही दिले.
यावेळी मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, शम्स सिद्दीकी ,फाल्गुन गोहोकार(तालुका अध्यक्ष), शिवराज पेचे (शहर अध्यक्ष)अयाज पठाण,लकी सोमकूवर व मनसे वाहतूक सेनेचे समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.