नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
•अपघाताची शक्यता , एसडीओना दिले निवेदन
सुरेंद्र इखारे,वणी – इंडोयुनिक कोल वॉशरी प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असल्याचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे याना दिले .
वणी तालुक्यातील पुनवट या गावाच्या शिवारात असणारी इंडोयुनिक कोल वॉशरी ही राज्यमार्गावर असल्याने नायगाव ,निलजइ खाणीतील कोळसा ट्रकद्वारे या कोल वॉशरी मध्ये जात असल्याने या राज्यमार्गावर कोळशाचे ट्रकच्या रांगा मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे या रस्त्यावरून जाणारे बेलोरा व नायगाव गावातील शाळकरी विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, शेतमजूर, गुरे घेऊन जाणारे गुराखी याना आपला जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे. कोल वॉशरी मधून निघणारा ट्रक सरळ राज्यमार्गावर आडवा होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या कोल वॉशरी कंपनीने राज्यमार्गावर अतिक्रमण केल्याने या राज्यमार्गाचे रूपांतर पाय वाटेत झाले आहे त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. वाहतुकीबाबत नित्याचे भांडणतंटे होऊन शांतता भंग पावत आहे. कोळश्याच्या वाहतुकीमुळे कोळसा रस्त्यावर सांडून प्रदूषण होत आहे .
याचा परिणाम शेत पिकांवर तर होतच आहे त्याच बरोबर मनुष्य सुध्दा प्रदूषणाचे विळख्यात सापडल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या कोल वॉशरी प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे सामान्य नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तेव्हा शासन प्रशासनाने विशेष लक्ष घालून कोल वॉशरी प्रशासनावर कारवाई करून नागरिकांच्या जीवाचे संरक्षण करावे अशी मागणी केली आहे .
संबंधित निवेदनाच्या प्रति आमदार संजीवरेड्डी बोडकुरवर, तहसीलदार वणी, उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग, शिरपूर पोलीस स्टेशन, व व्यवस्थापक इंडोयुनिक पुनवट याना देण्यात आले. यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, श्रीराम रानुरकर, प्रमोद लोडे, जयवन्त खोकले हे होते.