•भांडेवाडा तीर्थक्षेत्राला 2 कोटी देण्यात येणार.
• एका आर्थिक वर्षात एवढा मोठा निधी पहिल्यांदाच…
अजय कंडेवार,वणी:- पर्यटन व सांस्कृतिक कार्य.मंत्रालयातर्फे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत 5 कोटी रुपये वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नामुळे वणी विधानसभेतील चार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मिळाले आहेत.(5 crore funds will be provided to four pilgrimage sites due to the efforts of A. Sanjeevreddy Bodkurwar)
वणी तालुक्यातील जगन्नाथ बाबा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र भांदेवाडा येथे 2 कोटी रुपये, जैताई माता देवस्थान वणी साठी एक कोटी रुपये, रंगनाथ स्वामी देवस्थान वणी येथे एक कोटी रुपये व भवानी माता देवस्थान गोडगाव साठी एक कोटी असे या चार ठिकाणी सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी एकूण 5 कोटीचा निधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आणला आहे. या निधीतून या आर्थिक वर्षात बांधकाम सुरू होणे अपेक्षित आहे.कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा मार्फत सादर काम करून घेतल्या जाणार आहे. या संबंधित नियम, अटी व शर्थीच्या अधीन राहून जिल्हाधिकारी यांनी हे काम करून घेण्यासाठी शासनाने आदेश दिले आहे. एका आर्थिक वर्षात एवढा मोठा निधी पहिल्यांदाच उपलब्ध झाल्यामुळे या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.