•सुखाच्या वार्तेने शेतकऱ्यांचा उत्साह दुणावणार
अजय कंडेवार,वणी:- मृगात पाऊस आला की पीक पदरात पडते, ही आशा बाळगून हरहंगामी शेतकरी खरिपाची तयारी करतो. गेल्या काही वर्षांपासून मात्र मान्सून आणि मृगाचे सूर काही जुळले नाही. सारा मृग कोरडा गेल्याचा मोसमही पाहिला आणि मृगातल्या सुरुवातीच्या काही दिवसांत आलेला मान्सून नंतर बेपत्ता झाल्याचा अनुभवही शेतकऱ्यांनी सोसला. यंदाही मान्सून वेळेवर मेहेरबान नसल्याची चिन्हे होती. मृग नक्षत्र 22 जूनला संपताच आर्द्रा नक्षत्राचा सुरुवातीचा दुसऱ्या दिवशीच वणी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. या सुखाच्या वार्तेने शेतकऱ्यांचा उत्साह दुणावणार आहे.Salute to Ardra Nakshatra Rain in Wani…Relief of citizens from heat.
खरिपाचा सारा हंगाम पावसावर अवलंबून असतो. पावसाचे वागणे मात्र अलीकडे बदलले आहे. मान्सून दाखल झाला तरी मध्येच दडी मारणे आणि आला तर पार पिके धुवून काढण्याइतका बरसणे असा पावसाचा लहरीपणा राहिला आहे.
गेल्या वर्षी मान्सून बेताचाच बरसला. त्यामुळे उन्हाळ्या पाणीहाल झाले. यंदा मान्सून चांगला राहील, असा हवामान खात्याचा आणि अन्य संस्थांचा अंदाज होता. मात्र हे अंदाज पावसाने खोटे पाडल्याचाही अनुभव आहे. मात्र काल गुरूवारी रोजी आकाश अंधारून आले आणि पावसाला सुरुवात झाली. या आद्राचा पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे आणि तालुक्यात आर्द्रा नक्षत्राचा सरी चांगल्याच पडल्या व शुक्रवारी वणीत पावसाने प्रवेश केलाच.