•वणीच्या शिरपेचात मानाचा तोरा…..
•तेलंगणा राज्यात मॅकरून शाळेचा विद्यार्थ्यांना सिल्व्हर मेडल
अजय कंडेवार, वणी:- सेकंड इंटरनॅशनल मार्शल आर्ट कराटे चॅम्पियनशिप हैद्राबाद येथे दिनांक 13 नोव्हेंबर ला संपन्न झाली या स्पर्धेत मॅकरून शाळेतील चे विद्यार्थी गुंजन बडे ,आर्या तीमांडे ,अभिर देठे यांनी सिल्वर मेडल पटकविले.
हैद्राबाद येथे सेकंड इंटरनॅशनल मार्शल आर्ट कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत वणी येथिल खेळाडूनी मजल मारली आहे. तसेच या खेळाडूंनी तेलंगणा राज्यात वणीतील विद्यार्थ्यांनी वेगळीच छाप देखील निर्माण केली आहे. या कौशल्याच्या जोरावर वणीच्या शिरपेचात मानाचा तोरा दिला आहे. विशेष वणीतील विद्यार्थ्यांनीच सर्वाधिक मेडल प्राप्त केले आहे. त्यात सिल्व्हर, ब्राँझ, गोल्ड मेडल केवळ महाराष्ट्र अव्वल आहे.तसेच वणीचा विद्यार्थांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. अखेर पुन्हा एकदा ती म्हण पूर्ण झाल्याचे स्पष्ट होते की, मॅकरून चले तो…… दुनिया चलो…!!!!
यांचा यशामुळे शहरात चौफेर स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी यशाचं श्रेय आई ,वडील व शाळेचे संचालक पि. एस. आंबटकर शाळेचा मुख्यद्यापिका शोभना मॅडम व गुरु शरद चिकाटे यांना दिले.