•शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढणार ?
अजय कंडेवार,वणी : भारतीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नावाची मान्यता मिळताच शनिवारी वणी शहरातील बाजारपेठेत मोठ्या संख्येने शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली, तसेच सर्वांना पेढे भरवून तोंड गोड करण्यात आले.
वणीत कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विजयाच्या मोठ्या घोषणासुद्धा देण्यात आल्या. गेले कित्येक महिने हा वाद निवडणूक आयोगाकडे सुरू होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर वणी विधानसभा क्षेत्रात मोठे बदल घडून येणार असे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच घेतलेले धाडसी निर्णय व त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना त्यांच्या मतदार संघात विकासकामासाठी दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी हे वैशिष्ट्य ठरले असून अगोदरपासूनच शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा राबता सुरू होता, परंतु निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मोठा फायदा शिंदे गटाला होणार आहे.
या जल्लोषात विनोद भाऊ मोहीतकर,नाना सुगंदे,विजय मेश्राम मनिष सुरावार,राजु तुरानकर,ललित लांजेवार, युवराज ठाकरे,कैलास पकाले,संजय तोमस्कर ,शिरीष अवत ,गोलु घुमाळ,संजय साळुंके,प्रितम गवरी ,अमर शर्मान,विक्की हरोडे,पुल्लेवार,सुनील डोंगरे, राम क्षिरसागर, गौरव मांढरे,प्रकाश उत्तरवार,सत्यम चवरें,गणेश साळुंके,अभिजीत कुमरे,सौरभ गुंडावार, राजकुमार भगोड,अमोल कार्लेकर,प्रणय वचार,माणु शिंगाडे आदींसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.