नागेश रायपुरे,मारेगाव:-पोळ्याच्या पर्वावर तालुक्यात सात शेतक र्यांनी आपले जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटना घडल्या. दि ५ सप्टेंबर रोजी आ.बोदकुरवार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या भेटी घेत सांत्वन करीत आर्थिक मदत केली.
अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.जुलै, आगस्ट मध्ये झालेल्या महापूर व व अतिवृष्टी शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. त्यामुळे पोळ्याच्या पर्वावर लागातार सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.काल दि ५ सप्टेंबर रोजी आ.बोदकुरवार यांनी सतीश बोथले म्हैसदोडका,गजानन मुसळे नरसाळा,हरिदास टोनपे शिवणी धोबे, सचिन बोढेकर रामेश्वर, पुंडलिक रुयारकर बोरी गदाजी,तोताराम चिंचुलकर दांडगाव, अविनाश मेश्राम वेगाव या आत्महत्या ग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.आणि आर्थिक मदत केली. तसेच शासकीय मदतीचे आश्वासन दिले.
यावेळेस भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,शारदा पांडे सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.