•खरेदी-विक्री संघात “शेतकरी एकता पॅनलची सत्ता”
अजय कंडेवार,वणी:- खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शेतकरी खरेदी विक्री समितीची निवडणुक शुक्रवारी पार पडली . ही निवडणुक आमदार बोदकुरवार व ऍड. देविदास काळे यांचा नेतृत्वात शेतकरी एकता पॅनलने 17 पैकी 14 जागा जिंकले तर महाविकास आघाडीला 3 जागेवर समाधान मानावे लागले. तसेच त्यांचे स्वप्न एकता पॅनलने धुळीस मिळविले. प्रचारादरम्यान चुरशीची वाटणारी ही निवडणुक प्रत्यक्षात अगदीच एकतर्फी झाली. शेतकरी एकता पॅनलच्या विजयी उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना मोठ्या पराभवाची धुळ चारली.The MLA again foiled the intentions of the opposition..”Farmer Ekta Panel Power” in Buy-Sell Association
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला सुरवातीला नेते विरहीत असलेली ही निवडणुक नंतर मात्र दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे प्रतिष्ठेची बनली होती. काही नेत्यांच्या अट्टाहासामुळे काही परंपरा मोडीत निघुन निवडणुक लादली गेली. मतदारांनी सत्ता परिवर्तनाचे विरोधकांचे मनसुबे उधळुन लावले असुन या खरेदी विक्री समितीच्या निवडणुकीत 7549 मतदारांपैकी 3224 मतदारांनी मतदान केले.शेतकरी एकता कौल दिला आहे.
यात 2 ईश्वर चिठ्ठीने भगवान मत्ते व सोनल बोर्डे हे विजयी झालेत. याच गटातील नेताजी मोरे,राजाभाऊ पाथ्रडकर, अभय खाडे,ललीता भोंगळे, रेखा लाडे, विठठल पाचभाई,महादेव मत्ते,सुनिल वरारकर,विठठल कोडापे,विनोद कुचनकार,विलास मांडवकर,अशोक सुर हे सर्व भरघोस मतांनी विजयी झाले. त्यातही नेताजी मोरे यांनी सर्वात जास्त मते घेण्याचा मान पटकाविला.