•अन् ऍड विनायक एकरे बिनविरोध सभापती पदी निवड
अजय कंडेवार,वणी :- नुकत्याच पार पडलेल्या वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 14 संचालक विजयी झाले .चुरशीची समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत भाजपा व शिंदे सेना गटाच्या शेतकरी एकता पॅनलचे नेतृत्व विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले होते. त्यांच्या या नेतृत्वात विरोधकांचा धुव्वा उडवून एकतर्फी विजय मिळवला होता.परंतु आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीत चुरस आली. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.यापूर्वी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते परंतु या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप, शिंदे सेना गट उभे ठाकले होते. ही निवडणूक एकासेक असल्याने या निवडणूकित राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती . मात्र चुरशीची समजली जाणारी निवडणूक एकतर्फी झाल्याने विरोधकांचा दारुण पराभव झाला व भारतीय जनता पक्षाने वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला झेंडा फडकवला .The MLA’s “words….” turned out to be valuable..Adv Vinayak Akre unopposed Speaker.
आता मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत निवडून आलेले संचालक ऍड विनायक एकरे यांना सभापती तर विजय गारघाटे यांची उपसभापती निवड करण्यात आली.’ बाजार समितीचा किंग समजले जाणारे आमदार बोदकुरवार यांनी…. दिलेला शब्द पाडला .. हिच खरी राजकीय खेळी पद न पाहता त्यांनी शब्द दिलेला याची जाणीव ठेवत या निवडीला बिनविरोध करीत यशस्वी खेळी केली यात माञ काहीच शंका नाही.
यात नितीन पानघाटे, प्रभाकर बोढे, दिलीप बोढाले , मंगल बलकी, मोहन वरराकर , अशोक पिदूरकर, वेनुदास काळे, मीरा पोतराजे, वैशाली राजूरकर, प्रकाश बोबडे, चंद्रकांत हिकरे, हेमंत गौरकार हे अनुभवी व राजकीय पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याने प्रत्येकजण सभापती पदाच्या प्रतीक्षेत होतें.परंतू सभापती पदाची निवड करताना भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भूमिका महत्त्वाची असणार होती ती आजगत जाहिरही झाले आणि राजकारणात शब्दाची काय किमया असते तेही दाखवून एक ऐतिहासिक निर्णय बाजार समितीत झाला.