• सरपंचाने पुकारला एल्गार.
अजय कंडेवार,वणी:- आभई फाटा येथे चौफुली असून या परिसरात वाहने वेगात असतात. अनेक अपघात याच तीन महिन्यात झाले असुन आणखी अपघाताची दाट शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून तत्काळ गतिरोधक न बसविल्यास उग्र आंदोलनाचा इशारा ग्रा. पं सरपंच हेमंत गौरकार व ग्रामस्थ यांनी उपविभागीय अधिकारी यांना दि.24 मे.बुधवार रोजी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.Install a deadlock at Abhai Fata, otherwise..Sarpanch hemant Gaurkaar called Elgar.
आभई फाटा येथे चौफुली असून,कोरपणा, शिंदोला व वणी आशा तिन्ही बाजूने रस्ता येत आहे.मोठ्या प्रमाणात जड-वाहतूकही होत आहे. मागीत दोन महीण्यात अनेक जिवघेणे अपघात झाले असून या अपघातामध्ये आत्तापर्यंत 9 जणांचा नाहक बळी गेला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे आणि आत्ता तर मुंगोली पुलही बंद आहे . आता तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.वेकोली प्रशासनाचे कोळशाचे ट्रक व इतर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच वणीकडून येणारा रोड या तिनही रस्त्यांवर गतीरोधक आवश्यक आहे. येणाऱ्या काळात आपण या ठिकाणी गतीरोधक बसविले नाही तर या ठिकाणी पुन्हा मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.येथील अपघाताची मालिका सुरूच असल्याने येथे गतिरोधक बसविण्याची गरज आहे.
त्यामुळे येथे गतिरोधक न बसविल्यास येत्या 7 दिवसातच उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल या समोरील जबाबदारी संबधित प्रशासनाची असेल असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.