•विविध 178 गुन्ह्यातील दारूवर बुलडोजर
अजय कंडेवार, वणी:- जिल्हात पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी प्रलबिंत मुद्देमालाची निर्गती करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत शिरपूर पोलीस ठाणे हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये 178 गुन्ह्यातील जप्त केलेला दारू साठा नष्ट करण्याबाबत न्यायालयीन आदेश प्राप्त झाले होते. यामध्ये 178 गुन्हातील 16हजार 440 रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.Order received and… Shirpur police destroyed alcohol.Bulldozer on alcohol in various 178 offences.
दारूबंदी अधिनियमाखाली 1000 रूपयाच्या वरील रकमेच्या देशी/विदेशी दारू जप्त असुन सदर गुन्हा मध्ये न्यायालयात दोषारोपत्र पाठविण्यात आले होते. त्यामध्ये शिरपूर पोलिसांनी एकुण 178 गुन्हाचे निकाल प्राप्त करून अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क ,यवतमाळ यांना पत्र व्यवहार केला. त्यावरून न्यायालयाने 178 गुन्हामध्ये देशी विदेशी दारू नष्ट करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार 27 एप्रिल रोजी निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क पांढरकवडा यांचे प्रतीनिधी एन. के. सुर्वे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वणी हे शिरपूर पोलीस स्टेशनला हजर झाले. त्याच्या समक्ष देशी/विदेशी दारू च्या 178 गुन्ह्यामधील अनेक अश्या दारूचा बाटल्या मधील दारू खड्डात टाकुण व रोलरच्या सहाय्याने प्रतीष्ठीत पंचासमक्ष नष्ट करण्यात आला.यावेळी सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजल्लवार, वणी यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि.गजानन करेवाड (ठाणेदार, पोलीस स्टेशन शिरपुर) ,PSI कांडुरे यांनी केली.