•बोटोनी येथे भव्य दंडार व कबड्डी स्पर्धा संपन्न
नागेश रायपुरे,मारेगाव:- आदिवासी संस्कृती ही भारताची ओळख असून, दंडार लोककला ही आदिवासी समाजाची ओळख आहे ही कला आधुनिक काळात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांनी बोटोनी येथील चौताली दंडार व कबड्डी स्पर्ध्येच उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
स्थानिक आदिवासी कला मंचच्या वतीने बोटोनी येथे भव्य चौताली दंडार व कबड्डी स्पर्ध्येचे दि १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराजजी अहिर यांचे हस्ते करण्यात आले. तर अध्यक्ष म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा चे विजय चोरडिया ,दिनकर पावडे,तारेंद्र बोर्डे,तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे नगरपंचायतचे पाणी पुरवठा सभापती वैभव पवार बोटोनीच्या सरपंच संगीता जुमनाके,राहुल आत्राम आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी आ. बोदकुरवार यांनी शासनाच्या आदिवासी समाजासाठी असलेल्या विविध योजना लाभार्थ्या पर्यंत पोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी शंकर लालसरे,सुनीता लालसरे,विनोद जुमानाके आणि त्यांचे सहकाऱ्यानी परिश्रम घेतले.या वेळेस हंसराज अहिर यांचा वाढदिवसा निमित्त ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने सत्कार करण्यात आला.