Thursday, December 4, 2025
Homeवणीआता.! सुगंधीत तंबाखु व गुटख्यावर L.C.B चा छापा....

आता.! सुगंधीत तंबाखु व गुटख्यावर L.C.B चा छापा….

• सुंगंधित व गुटखा तस्करी त्यात मुख्यसूत्र कोण? ड्रायव्हरवरच गुन्हे दाखल केल्या जातो पण मुख्यमोरक्या मोकाटच  का …? 3 महिने गेले मग प्रकरण दबले का ?

•आता L.C.B त्या प्रकरणाचा तपास हाती घेईल का हे देखील पाहणे गरजेचे…

अजय कंडेवार,वणी :- राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही वणी शहरात मात्र खुलेआम सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. स्थानिक गुन्हे शाखेने साने गुरुजी नगर फाले ले-आउट वणी येथील परिसरात काल सकाळी 2 लाख 63 हजार 670/- रुपये चा रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूसह मुद्देमााल जप्त केला असून याप्रकरणी एकास अटक करून त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

परिसरात गुटखा विक्री पूर्ण बंद असल्याचा दावा संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे दिसत आहे. राज्यात गुटखा विक्री व उत्पादनाला पूर्ण बंदी आहे.मात्र वणी तालुक्यात खुलेआम दररोज लाखो रुपयांचा गुटखा विक्री होत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची आयात केली जाते हेही मागील महादेव नगरीतील पाण्याचा टाकीजवळ झालेल्या एका कारवाईत उघड झाले आहे. मोठ्या गुटखा विक्रेत्यांकडून हा गुटखा छोट्या विक्रेत्यांना विकला जातो. संबंधित खात्याला याची कल्पना असतानाही गुटखा विक्रेत्यांविरुद्ध जाणीवपूर्वक कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. असे म्हणायलाही काहीं हरकत नाहीं.अश्यातच स्थानिक गुन्हे व डीबी विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यांचा अनेक कारवायाने अवैध धंद्याला आळा बसणार त्यात काहीं शंकाच नाही. त्यातीलच एक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने साने गुरुजी नगर फाले ले-आउट वणी येथील परिसरात आरोपी मुनाल उर्फ मुन्ना नवनाथ बेलकर (वय ३४ वर्ष ) रा. वार्ड क्रमांक ६ फाले ले-आउट साने गुरुजी नगर वणी याला ताब्यात घेतले. तसेच अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यवतमाळ यांनी आरोपी मुनाल उर्फ मुन्ना नवनाथ बेलकर यांचे विरुद्ध पोलिस स्टेशन वणी येथे व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमणे २०११ चा कायद्याअंतर्गत विविध गून्हे दाखल करण्यात आले.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पोउपनि योगेश रंधे,उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे,नरेश राउत सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी जबरदस्तरित्या कार्य पार पाडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments