•प्रदूषण मुक्त वातावरणासाठी हा प्रकल्प वरदान ठरेल.
माणिक कांबळे /मारेगाव:- अनिता फार्मर प्रोडूसर कपंनी मारेगावच्या वतीने मार्डी येथे सि एन जी गॅस निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहे.गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वावर या केंद्राचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. कपंनीचे डायरेक्टर गजानन चौधरी यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या सोहळ्यात माजी सरपंच भास्कर धानफुले यांनी कुदळी मारून भुमीपूजन केले.
हा प्रकल्प येत्या दोन वर्षात नागरिकांच्या सेवेत उभा असणार आहे. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या आशा या प्रकल्पा मुळे पल्लवीत झाल्या आहेत. हा प्रकल्प मोठया प्रमाणात सी एन जी गॅस निर्मिती करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून पीकविला जाणार आहे. सी एन जी गॅस निर्माण होणाऱ्या पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या शेतातून करण्यात येणार आहे.त्यासाठी लागणारे रोपटे कपंनी उपलब्ध करून देणार आहे.त्यामुळे काही प्रमाणात बेरोजगारी दूर होऊन खाली हाताला काम मिळेल अशी शाश्वती तालुका वासियांना आहे. प्रदूर्षण मुक्त वातावरणासाठी हा प्रकल्प वरदान ठरेल अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमी मधून व्यक्त होत आहे.तालुक्यातील मार्डी येथील अविनाश हरबडे यांच्या शेतात हा सी एन जी गॅस प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. यासाठी हरबडे यांनी आपली शेतजमीन अनिता फार्मर प्रोडूसर कपंनीला लिजवर दिली असून या जमिनीवर 25लाखाच्या इष्टीमेटचे बांधकाम मंजूर झाले आहे. या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा ता 29जूनला करण्यात आला आहे.
या सोहळ्यात कपंनीचे डायरेक्टर गजानन चौधरी, अतुल बोबडे, प्रवीण कुचणकर,गजानन आसुटकर, बंडू टोंगे,सुरेश मुरस्कर,चौधरी,या सह मार्डी चे सरपंच रविराज चंदनखेडे, प्रफुल झाडें, विठ्ठल मांढरे,प्रमुख पाहुणे म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.