•मनसेसैनिकांचे रौद्ररूप येत्या 8 दिवसात दिसणार.
अजय कंडेवार,वणी:- नगर पालिकेच्या मृत जलशुद्धीकरनाचे नूतनीकरण करून जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा , दूषित, दुर्गधीयुक्त व अशुद्ध पाणी पुरवठ्याचा तात्काळ शुध्द पाण्याचा पुरवठा करावा याबाबतचे निवेदन (गुरूवार दि.6 एप्रिल) रोजी मनसे शहर अध्यक्ष शिवराज पेचे व मनसे सैनिक यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले आहे. Now…MNS’s ball is in the hall of the municipality…! The red face of Manse soldiers will be seen in next 8 days.
शहरातील काही भागात गढूळ पाणी पुरवठा होत असून या पाण्याला वास येणे, पाण्यातून अडोळ्या येणे व गळुळ पाणी येत असल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. शहरातील वॉटर फिल्टर मृत अवस्थेत असल्यामुळे घडत असून तुरटी, ब्लिचिंग पावडर क्लोरीन गैस चा वापर करणे, खळखळणाऱ्या प्रवाहातून पाणी शुद्ध करणे तसेच इतरही अनेक प्रक्रियेमार्फत पाणी शुद्ध करावे लागत असते असे असताना सुद्धा शहरातील अनेक भागातील सांडपाणी सरळ नदीत सोडण्यात येत असून तेच पाणी नागरिकांना पिण्याकरिता शहरात पाठविले जात आहे. पाणी मानवी शरीराकरिता अत्यंत आवश्यक आहे. पाणी हे रक्त डिटॉक्स करण्यास मदत करत असते आणि हेच दूषित पाणी माणसाच्या शरीरात जात असेल तर मृत्यू अतिशय जवळ आहे असे म्हणायला हरकत आहे.याकडे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दयावे. तसेच शहरात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. व लवकरात लवकर पालिकेने शुध्द पाण्याचा पुरवठा करावा. तसेच शहरत असलेली भूमिगत पाईपलाईन जीर्ण होऊन फुटलेली असून शहरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत आहे. दैनंदिन कामामध्ये नागरिक व गृहिणी महिलांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत आहे.
दोन्ही बाबी अतिशय गंभीर असून सदर प्रश्न येत्या 8 दिवसात निकाली काढून शहरात नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा नदीचे पाणी अधिकाऱ्यांचा दारी ही मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरपालिका प्रशासना विरोधात राबवेल.यात कायदा व सुव्यवस्था अबाधित झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
यावेळी शिवराज पेचे (वणी शहर अध्यक्ष), नितेश वैद्य (उपाध्यक्ष), अजीज शेख, लकी सोमकुवर,शंकर पिंपळकर,अमोल मसेवार, युनूस खान, सारंग चिंचोलकर, अंकित पिदुरकर, त्रंबक ढोरे, सौरभ धांडे तसेच अनेक महिला उपस्थित होत्या.