•बाईक रॅलीने लक्ष वेधले
•कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाला सुरुवात.
अजय कंडेवार,वणी :- अंशदायी पेन्शन योजना बंद करीत जुनी पेन्शन योजना सुरू करावी यासाठी दिं 14 मार्च मंगळवारपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी वणी येथील तहसिल क्षेत्राचा आवारात राज्यव्यापी बेमुदत संपाला सुरुवात केली आहे.अनेक कर्मचारी यात सहभागी झाले.विशेषता शहरातील मुख्य मार्गांवरून भव्य बाईक रॅली काढण्यात आली तसेच तहसील परिसरात रॅलीचे सभेत रूपांतर झाले.Old pension is needed now.. Government will increase tension.
या संपात तालुक्यातील तब्बल शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहे, अनेक विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी होत लक्षवेधी आंदोलन केले.या Pension plan for employee कर्मचारी संपात सहभागी झाल्याने सर्वच शासकीय कार्यालयात शुकशुकाटाचे वातावरण पसरले होते. Statewide indefinite strike राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीच्यावतीने कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देवून सेवा नियमित करावी, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने राज्य कर्मचारी संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यसरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या हाकेला प्रतिसाद देत महसूल, शिक्षण, आरोग्य, पंचायत, भूमी अभिलेख या सह इतरही सर्व संघटना एकत्र आल्या. एनपीएस रद्द करा जुनी पेन्शन लागू करा ही संघटनाची मुख्य मागणी आहे. विशेष म्हणजे स्त्री कर्मचारी यांनी देखील या संपात हिरीरीने एकत्र आले. त्यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट आहे.