• उपसरपंच ॲड.रुपेश ठाकरे यांनी भरला दम….
अजय कंडेवार,वणी :- मुंगोली गावातील नागरीक
जीव मुठीत ठेऊन पडक्या अवस्थेत असलेल्या घरात नाईलाजास्तव वास्तव्य करत आहे. अश्या स्थितीतही तिथे ब्लास्टिंग होत असते म्हणूनच मुंगोली गावालगत होणारी ब्लॉस्टिंग पुर्णता बंद करण्याकरीता मुंगोली ग्रामपंचायत उपसरपंच ॲड.रुपेश ठाकरे यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदनातून साकडे घातले आहे. तसेच क्षेत्रीय महाप्रबंधक उर्जाग्राम (ताडाळी )व उपक्षेत्रीय प्रबंधक (मुंगोली) यांनाही प्रतिलिपी पाठविले आहे.Now… if Mujor Wekoli doesn’t listen.Sarpanch Rupesh Thackeray breathed on WCL..
मुंगोली गावातील घरे ही ब्लॉस्टिंगच्या हादऱ्यांनी पूर्णता मोडकळीस आलेली आहे. गावातील नागरिक लवकर पुनर्वसन होईल या आशेने जीव मुठीत ठेऊन पडक्या अवस्थेत असलेल्या घरात नाईलाजास्तव वास्तव्य करत आहे. ब्लास्टिंगची तीव्रता कमी करण्याबाबत अनेकदा स्थानिक प्रशासन व वेकोली (W.C.L.) प्रशासन यांना देन्यात आली. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
१५/०४/२०२३ ला गावातील महिलांना घेऊन उपक्षेत्रीय प्रबंधक मुंगोली उपक्षेत्र यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली, त्यांनी आश्वस्तही केले होते त्यात ब्लास्टिंगची तीव्रता कमी करू व १५ दिवसानंतर ब्लास्टिंग पूर्णता बंद करू मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. आजतागायत ब्लास्टिंग तीव्र स्वरुपात करत असुन वारंवार दूरध्वनीच्या माध्यमातून ही ब्लास्टिंग कमी करावी याबाबत विनंती केली, मात्र वेकोली (WCL) प्रशासन ऐकायला तयार नाही.
आता मुंगोली गावातिल घरांची पडझड किता जिवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी वेकोली (W.C.L) प्रशासन तथा स्थानिक प्रशासनाची राहील आणि मुंगोली गावालगत होणारी ब्लास्टिंग पुर्णता बंद झाली नाही तर स्वतःचा जीव वाचावा म्हणुन नाईलाजास्तव उग्र स्वरूपाचा आंदोलन करावे लागेल २-३ दिवसात करावी अन्यथा होणाऱ्या अनुचित प्रकराला जिम्मेदार स्थानिक प्रशासन व (wcl) वेकोली प्रशासनाची राहील असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायत सरपंच रुपेश ठाकरे यांनी दिले आहे.