•मग नगरपरिषद स्वच्छतेसाठी नाही का हो… चला करा.! पूर्वरत सूरु अशी युवासेनेची मागणी
अजय कंडेवार,वणी:- शहरातील मुख्य बाजारपेठेत जवळपास 40 ते 50 वर्षा अगोदर सुरु असलेले मुत्रीघर मागील एक ते दिड महिन्यापासून बंद असून ते पूर्ववत सुरू करण्याकरीता अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख व कार्यकर्ते यांनी नगरपरिषदचा मुख्याधिकारी यांना निवेदनातून साकडे घातले आहे.
मुख्य बाजारपेठ असलेल्या (गांधी चौकात) मागील 40 ते 50 वर्षा अगोदर पासून सुरू असलेले पुरुष मुत्रीघर गेल्या महिनाभरापासून कोणतीही जाहिरात न काढता नगर परिषदेकडून बंद करण्यात आले आहे व नगर परिषदेकडून या मुत्रीघरासमोर कुलूप लावून नगर परिषद आरोग्य विभागाच्या मागे असलेले मुत्रीघर वापरण्यात यावे असे बोर्ड लावण्यात आले आहे.
परंतु हे मुत्रीघर मुख्य बाजारपेठेपासून थोडे दूर आहे. ज्यामुळे व्यापारी वर्ग आपले दुकान सोडून तितक्या दूर जाऊ शकत नाही. शिवाय हे मुत्रीघर अनेक वर्षांपासून सुरू होते. हे मुत्रीघर बंद करण्याच्या मागे मुत्रीघराची दुर्गंधी येत असल्याचे कारण देण्यात येत आहे. परंतु इतक्या वर्षांपासून नाही मग आताच ही दुर्गंधी येत आहे काय? जर दुर्गंधी येत असेल तर ते स्वच्छ करण्याचे काम हे नगर परिषदेचे आहे. शिवाय या ठिकाणी एक पाण्याची टाकी लावण्यात येण्याची मागणीही करण्यात आली. निवेदन देताना युवासेना उपप्रमुख व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.