•आ.संजीवरेड्डी बोदकूरवार यांचा खंबीर नेतृत्वात.
अजय कंडेवार,वणी :- “राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांचा अपमान केला आहे. त्याचबरोबर इतर काही काँग्रेसचा नेत्यांकडून वीर सावरकर यांच्यावर अपमानजनक वक्तव्ये करण्यात आली. हा महाराष्ट्र सहन कदापि करणार नाही,” आणि आता जनताच विरोधकांना दाखवून देईल, असे खडेबोल वणी विधानसभा क्षेत्र मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी १ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह वणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.Savarkar Gaurav Yatra in Wani City today.. M.L.A Sanjeevreddy Bodkurwar will benefit from strong leadership.
गौरव यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण वणी शहर भगवामय झाले आहे. ” होय मी सावरकर….अशी टोपी घालून या गौरव यात्रेची सुरुवात वणी शहराच्या शासकीय मैदानावरील पाण्याच्या टाकीजवळून दिं.5 एप्रिल 2023 सायंकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील हभप मंडळी, सामाजिक संघटना, संस्था व व्यावसायिक संघटनांचा “गौरव यात्रेत” प्रामुख्याने सहभाग असणार आहे.
ही यात्रा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात शहराच्या शासकीय मैदानावरील पाण्याच्या टाकीपासून निघणार स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा शहराच्या मुख्य मार्ग टिळक चौक -संभाजी चौक-गांधी चौक-भगतसिंग चौक-स्वा. सावरकर चौक-टागोर चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – पुन्हा टिळक चौक अशी येणार असून या गौरव यात्रेचा समारोप टिळक चौक येथे होणार आहे. समारोप नंतर स्वा. सावरकर यांचा जीवनावर व्याख्यान स्वरूपात दया शंकर तिवारी (नागपूर ) हे प्रकाश टाकणार आहे. य