•व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा उद्घाटन सोहळा.
•पत्रकारिता क्षेत्रात आयुष्य वेचणाऱ्या पत्रकारांचा मरणोपरांत सन्मान व जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार..
अजय कंडेवार,वणी :- वणी उपविभागातील एकमेव व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा वतीने आज रविवारी 26 फेब्रुवारी रोजी उद्घाटन समारंभ दुपारी 12.00 वाजता वसंत जीनिंग हॉल, वणी येथे होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहेत. लोकसत्ताचे संपादक, प्रसिद्ध विचारवंत, व्याख्याते देवेंद्र गावंडे उद्घाटक वक्ते असणार आहेत. तर तरुण भारत डिजिटल मीडियाचे संपादक तसेच शैलेश पांडे यांचे अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर वणी -आर्णी -लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, दि वसंत जिनिंग वणीचे अध्यक्ष आशिष खूलसंगे यांची उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे.
व्हॉइस ऑफ डिजिटल मीडियाच्या वतीने आयोजित या उद्घाटन सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात आयुष्य वेचणाऱ्या पत्रकारांचा मरणोपरांत सन्मान व जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. पत्रकारितेत स्वतःला वाहून घेणाऱ्या पत्रकारांच्या सहचरणीला त्यांचा मरणोपरांत सन्मान म्हणून साळी चोळी, सन्मान चिन्ह व सन्मान राशी देण्यात येणार आहे. तर आपली संपूर्ण हयात पत्रकारितेत घालविणाऱ्या पत्रकारांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.असा हा आगळा वेगळा उद्घाटन सोहळा वणी येथे रंगणार आहे. त्याचे प्रत्यक्षदर्शी आपणही व्हावे असे आव्हान व्हॉइस ऑफ डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजू निमसटकर, उपाध्यक्ष राजू तुराणकर, सचिव अजय कंडेवार, सहसचिव प्रशांत चंदनखेडे, कोषाध्यक्ष रमेश तांबे, सल्लागार ऍड. दिलीप परचाके, सदस्य संतोष पेंदोर, दिलदार शेख, राजू कांबळे, राजू गोरे, आनंद नक्षने, प्रशांत जुमनाके, संतोष बहादूर, देव येवले यांनी केले आहे.