•सुप्रसिद्ध विचारवंत डॉ प्रल्हाद लुलेकर यांच्या व्याख्यानाचे लाभ घेण्याचे आवाहन …
सुरेंद्र इखारे,वणी :- येथील शिवभक्त समितीद्वारे दिनांक 15 व16 ऑक्टोबर2022 रोजी बाजोरिया लॉन वरोरा रोड वणी येथे सायंकाळी 6.30 वाजता समितीने सतत 8 व्या वर्षी सुद्धा बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. वणी शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय चळवळ जोपासणारी अशी ओळख असल्याने शिवभक्त समितीने 15 ऑक्टोबर ला स्मृतिशेष रामचंद्र सपाट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतीपुष्प पहिले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवभक्त समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी असणार तर सुप्रसिद्ध विचारवंत व्याख्याते डॉ प्रल्हाद लुलेकर हे दलितेतरांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर याविषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहे.
प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, डॉ निलेशा बलकी, डॉ चेतन खुटेमाटे, प्रदीप बोनगीरवार, ममता जोगी, बंडू रासेकार, उपस्थित राहणार आहे. तसेच 16 ऑक्टोबर ला स्मृतिशेष संबशिव देवडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतीपुष्प दुसरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहाबुद्दीन अजाणी असून डॉ प्रल्हाद लुलेकर हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकशाहीचे वर्तमान याविषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहे.
यावेळी एसडीपीओ संजय पुज्जलवार, किशोर गजलवर बीडीओ, जब्बार चिनी, अंबादास वागरकर, नीलिमा काळे, डॉ प्रणाली दुमोरे,नितेश ठाकरे उपस्थित राहणार आहे. तेव्हा वणी परिसरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, ठेवा जोपासणाऱ्या सर्व क्षेत्रातील नामवंत, कवी,लेखक,समाजसेवक,लोकप्रतिनिधी व व्याख्यानमालेच्या आवडत्या श्रोत्यांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन शहाबुद्दीन अजाणी, डॉ करमसिंग राजपूत, कृष्णदेव विधाते, डॉ सुनील जुमनाके, अशोक चौधरी, अनिल टोंगे, डॉ अर्षद शहा, जणू अजाणी, विलास शेरकी, अनंत मांवकर, मोहन हरडे, शंकर पुनवटकर, अनिल घाटे, अजय धोबे, वसंत थेटे, महेंद्र खडसे, रवींद्र अंबतकर, सतीश पिंपळकर, मारोती जीवतोडे, गणेश बूटे, विनोद किडीले, रघुनाथ कांदळकर, संदीप ठाकरे, मो मुस्तक, सुरेंद्र घागी संजय गोडे, रामकीसन ताजने, संजय कालर, विजय दोडके, किसन कोरडे यांनी केले आहे.