तथागत बुद्ध विहार व रमाई महिला मंडळाचे आयोजन
नागेश रायपूरे, मारेगाव:- धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन व वर्षावास सांगता समारोह निमित्त आज 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता येथील तथागत बुध्द विहार समोर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संविधान मनवरे यांचा बुध्द भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन तथागत बुध्द विहार कमेठी व रमाई महिला मंडळ देवाळा यांचे वतीने करण्यात आला आहे.
तालुक्यातील देवाळा येथील तथागत बुध्द विहार कमेठी व रमाई महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास सांगता समारोह निमित्त विविध सामाजिक समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येते.
त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी सुद्धा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संविधान मनवरे यांचा संगीतमय बुध्द भीम गीतांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन आज 15 ऑक्टोबर रोजी येथील विहारा समोर करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील तमाम भीम गीत संगीत प्रेमींनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.