•मनसे नेते राजू उंबरकरांचा”तेजस्विनीला”आधार…..!
अजय कंडेवार,वणी:- कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या बोर्डा येथील एका मुलीचे पालकत्व मनसे नेते राजू उंबरकर यांनी स्वीकारले आहे.
बोर्डा गावातील कू.तेजस्विनी सतिश नक्षिने हिचा कुटुंबातील दोन वर्षापूर्वी आई आणि वडिल यांचे निधन झाले. या कुटुंबातील थकलेल्या परिस्थितीत असणारा आजोबा कसा बसा तूटपुंज्या कमाईतून घर चालवायचे. घरातील रोजच्या खर्चापासूनच स्वत:च्या शिक्षणाचाही खर्च निर्माण झाला होता. या मुलीचे पालकत्व जबाबदारी मनसे नेते राजू उंबरकर यांनी हाती घेतली.
विशेषतः मनसे नेते राजू उंबरकर पक्ष वाढीसाठी बोर्डा या गावी गाव भेट म्हणून ता.4 ऑक्टो रोजी आयोजित दौरा होता . या दौऱ्यात बोर्डा गावातीलच एका महीलेने तिचा गावातील ” तेजस्विनी ” बद्दल माहिती सांगितली असता.जराही विलंब न लावता मनसे नेते उंबरकरानी तिला भेट देण्याचे ठरले आणि तेजस्विनीचा घरी भेट दिली व संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेतला त्याच क्षणी सर्वांचा समक्ष राजू उंबरकरांनी त्या तेजस्विनी म्हंटले कि, “आजपासून हा राजू उंबरकर तुझा बाप” असे उदगार काढताच मुलीचा डोळयात अश्रू अनावर झाले.सामाजिक बांधिलकी म्हणून या मुलीचे संपूर्ण शिक्षणाचा व लग्नाचा खर्च उचलला आहे. नक्षिने कुटुंबाचे झालेले नुकसानभरपाई कधीच होऊ शकत नाही; मात्र आपण सामाजिक बांधिलकी जाणून जे जे शक्य आहे, त्या गोष्टी तर नक्कीच करू शकतो. या मुलांचे शिक्षण महत्वाचे आहे आणि तिचे स्वप्न साकार करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याची हमी देखिल देण्यात आले त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे मनसे नेते राजू उंबरकर यांनी यांनी जाहीर केले.