वणी:- नवरात्र उत्सवाला थोड्याच दिवसात सुरुवात होत आहे. जिल्हयाला नवरात्र उत्सवाची मोठी परंपरा आहे. हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी सर्वत्र विविध सांस्कृतीक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान गरबा प्रशिक्षण आणि गरबा महोत्सवाचे आयोजन ही मोठया प्रमाणात आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दरवर्षी वणी शहरात दांडीया गरबा महोत्सवाचे आयोजन करते. याही वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दांडिया गरबा उत्सवाचे आयोजन केले आहे. आज दिनांक २ ऑक्टोबर पासून या गरबा प्रशिक्षणाची शहरांतील विराणी फंक्शन हॉल मध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. हे प्रशिक्षण आजपासून पुढील १२ दिवस चालणार आहे.
मनसेकडून विभागात सातत्याने विविध सण समारंभाचे आणि उत्सवाचे आयोजन करण्यात येते. नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी महोत्सवास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. आता यानंतर मनसे कडून दांडिया गरबाचे आयोजन करुन पुन्हा एकदा वणीकर जनतेला सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देण्यात येतं आहे.
गत वर्षात आयोजित करण्यात आलेल्या दांडिया गरबा महोत्सवात विभागातील हजारो महीला व विद्यार्थिनींनी यात सहभाग नोंदविला होता. याकरिता विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ही देण्यात आली होती. आता या वर्षीच्या गरबा महोत्सवात आयोजकांकडून कोण कोणते आकर्षक बक्षीस देण्यात येतील याची उत्सुकता स्पर्धकांना लागली आहे.
या दांडिया गरबा उत्सवाचे प्रशिक्षण आजपासून सुरु होणार असुन हे प्रशिक्षण शहरातील विराणी फंक्शन हॉल येथे दुपारी आयोजन करण्यात येणार आहे. मनसेच्या गरबा प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून दुपारी ५.०० ते सायंकाळी ०९.०० पर्यंत असणारं आहे. आज या प्रशिक्षणाचे पक्ष नेते राजु उंबरकर व पुरुष महिला मनसे पदाधिकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असुन प्रशिक्षणाला सुरूवात करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात महिलांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे करण्यात येतं आहे..