•पोलीस स्टेशन मारेगाव येथे शांतता कमेटीची बैठक
नागेश रायपुरे,मारेगाव:-आगामी सण उत्सव शांततेत पार पाडा.गावातील शांतता भंग होणार असे कोणत्याही उत्सव मंडळा कडून कृत्य घडणार नाही याची दक्षता स्वतः मंडळांनी घ्यावी.प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्या जाईल.असे आवाहन पोलीस स्टेशन मारेगाव येथे पार पडलेल्या शांतता कमेठीच्या बैठकीत कर्तव्यदक्ष ठाणेदार राजेश पुरी यांनी केले.
आगामी काळात नवरात्र, धम्मचक्र प्रवर्तन दिन,दसरा,ईद- ए- मिलाद, आदी सण उत्सवाच्या पर्वावर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याचे उद्देशाने स्थानिक पोलीस स्टेशन येथे शांतता कमेठीची बैठक पार पडली.
यावेळी मारेगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार राजेश पुरी यांनी दुर्गा उत्सव मंडळांतील अध्यक्ष, सभासदाना सुचना देत उपस्थित प्रतिष्ठित नागरिकांसह पत्रकार मंडळींना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.