•शिरपूर पोलिसांचा दिसला दम.
अजय कंडेवार,वणी:- शिरपूर पोलीस स्टेशनचा हद्दीत आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त शिरपूर ठाणेदार API संजय राठोड यांच्या नेतृत्वात दि.18 सप्टें.सोमवार रोजी शिरपूर पोलिसांनी रुट मार्च व पथसंचलन केले.
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये,याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला. गणेशोत्सव व ईद- ए- मिलाद सणाचा कालावधीत कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही व सणउत्सव शांततेत पार पाडाव्यात याबाबत नवनियुक्त ठाणेदार API संजय राठोड यांनी सूचना दिल्या .सदर रूट मार्च व पथसंचलनाला PSI रामेश्वर कांडूरे ,पोलिस कर्मचारी व होमगार्ड असे सोबत होतें . कायर गावात पोलीसांचा रूट मार्च काढून गावचा आढावा घेण्यात आला .
“ईद -ए -मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच समस्त नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खात्री देखील घ्यावी कारण येणाऱ्या सण उत्सवात सामाजिक शांतता राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत आणि सामाजिक सलोख्याला बाधा येईल किंवा कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) प्रसारित करु नये. तसे आढळून आल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल.– A.P.I संजय राठोड (ठाणेदार पो. स्टे, शिरपूर)