•वाढता प्रभाव बघता “पाठमाग विरोधकांचे” संस्थेवर षडयंत्र सुरू…..
अजय कंडेवार, वणी:– वणी व चंद्रपूर जिल्ह्यात 14 शाखांचे एक मोठे वृक्ष असलेल्या तसेच 703 कोटी 82 लाखांच्या ठेवी असलेल्या रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक अनियमितता झाल्याचा बिनबुडाचा आरोपाला स्पष्ट खंडन करीत संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे यांनी काल दिनांक 30 जाने.सोमवारी त्यांचा स्वतःचा चेंबर मध्ये पत्रकार परिषदेतून पुरव्यासहित जाहिर खुलासा करून खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांचे धाबे दणानून टाकले आहे.
रंगनाथ स्वामी पतसंस्थेत 24 सप्टेंबर 2022 ला आमसभा झाली. या आमसभेत शेअरधारकांन 6 टक्के लाभांश वाटण्यात आला. पतसंस्थेचा नफा चार हजार 524 रुपये 35 पैसे इतका आहे, हे वास्तव लपविण्यात आले आहे. असे अभिकर्तद्वारे खोटे आरोप ही लावले.संस्थेसाठी रंगनाथ चेंबर ही तीन मजली इमारत तीन कोटी 16 लाख रुपयांत विकत घेण्यात आली. असे त्या कामावरून काढून टाकलेल्या अभिकर्त्याचे म्हणणे आहे. परंतू संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे यांनी या आरोपाचे कागदपत्रांद्वारे पुरावे सादर करीत त्या आरोपाला खंडण करीत आरोप बिनबुडाचे आहे आणि खातेधारकाना भ्रम निर्माण करीत आहे.एक प्रकारचे षडयंत्र आहे असे देखील पत्रकार परिषदेतून सांगत होते.यातील 30 सप्टेंबर 22 रोजी 19 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. यामध्ये वणी, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, गडचांदूर, भद्रावती येथील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. म्हणूनच हे संस्थेची बदनामी करीत आहे. तसेच ज्या काही तक्रारी किँवा आरोप केले आहे त्या जुन 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीतच विरोधकांनी जाहीरपत्रक व पोर्टल वर बातम्या देवुन केले होते तेच आरोप तक्रारी आता यवतमाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही केले आहे. म्हणजे निश्चीतच हयात विरोधकांचा हात आहे. असा धक्कादायक आरोपही पत्रकार परिषदेतून ॲड. देविदास काळे यांनी केले आहे.
“श्री रंगनाथस्वामी पतसंस्थेने पुन्हा त्यांना अभिकर्ता म्हणून काम करू द्यावे, यासाठी अशाप्रकारे ते संस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. संस्थेवर बिनबुडाचे आरोप करून संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेकडून त्यांच्यावर बदनामीपोटी न्यायालयात दावा दाखल केला जाईल, असे संस्थेचे अध्यक्ष ॲड देवीदास काळे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.”