अजय कंडेवार,वणी- शिरपूर येथील श्री गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहायक शिक्षक श्री मोतीराम लक्ष्मण परचाके याना पदोन्नती मिळून प्राचार्यपदी वर्णी झाली आहे. गेल्या 31 वर्षांपासून श्री गुरुदेव विद्यालया व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सेवेचे व्रत स्वीकारून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे मोतीराम लक्ष्मण परचाके यांनी आपल्या अत्यन्त कुशल, सुस्वभावाणे सर्वांना आपलंसं करून टाकल इतकेच नव्हे तर विद्यार्थी प्रिय असून पालकांशी त्यांचा दाट संबंधामुळे परिसरातील विद्यार्थ्यांची ओढ गुरुदेव विद्यालयाकडे असल्याने विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडली असून नावलौकिक मिळविला आहे .मोतीराम परचाके हे सहायक शिक्षक असताना त्यांनी नागपूर येथील आकाशवाणी चे “बी” श्रेणीचे गोंडी भाषेमध्ये लोकगीत गायिले आहे . लोककला, भावगीत, देशभक्तीपर गीत इतकेच नव्हे तर शालेय पाठ्यपुस्तकातील काव्य गायन करत असतात.गावातील सांस्कृतिक कलामंचमध्ये तसेच राष्ट्रीय कार्यक्रम असो किंवा शालेय यामध्ये सूत्रसंचालनात हातखंडा ,त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य असल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सहकार्यवाह म्हणून काम पाहिले .
अश्या अनेक शालेय उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या मध्ये असलेली कला व संगीत जोपासत ते जिथे जिथे जाईल त्या ठिकाणी किंवा शालेय उपक्रमात आपल्यामधील असलेलं कौशल्य प्रकट करून सर्वांना हसवत अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शिक्षकाची पदोन्नती होऊन प्राचार्यपदी आज रुजू झाले आहेत . त्यामुळे त्यांच्यावर परिसरातून पुढील कार्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत असून शुभेच्छा दिल्या जात आहे.