● मोची, मादगी, मादीगा, मादरू महासंघाचा पाठिंबा
वणी : राजूर येथे रेल्वे व वेकोलीचा माध्यमातून राजूरवासीयांच्या मूलभूत हक्कावर होत असलेल्या गळचेपी मुळे राजूर बचाव संघर्ष समितीचे वतीने बेमुदत आमरण उपोषणाला वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला गेल्या 8 दिवसापासून उपोषण सुरु होते.त्यांना M 4 तर्फे जाहीर पाठींबा 22 ऑक्टोबरला देण्यात आला .


ह्या उपोषणाला पहिल्याच दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. शंकरराव दानव व अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदेचे कॉ. गीत घोष यांनी भेट देऊन राजूर वासीयांच्या हक्काच्या लढाईला समर्थन केले आहे, तसेच क्रांती युवा संघटना, तसेच मोची, मादगी, मादीगा, मादरू महासंघाने देखिल पाठिंबा दर्शविला आहे, तसेच संघर्षात सोबत असल्याचे वचन दिले, विविध सामाजिक संघटनांनी सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केला असुन, विविध प्रांतातील तसेच विविध धर्मातील लोक राजूर येथे वास्तव्य करीत असुन त्यांच्या पुनर्वसनाच्या मुद्यावर चर्चा फिस्कटली असुन त्यांचे उपोषण अद्याप तात्पुरता पालकमत्र्याचा चर्चात्मक आदेशाला मान देत तात्पुरता स्थगिती देण्यात आली आहे.


राजूर येथे आलेल्या वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांच्या कोळसा सायडिंग व वेकोलीचे होत असलेले खाजगीकरण ह्यामुळे येथील राहिवासीयांना त्यांची राहत असलेली घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे येथील कोळसा सायडिंग रहिवासी क्षेत्रालगत असल्याने गावात प्रचंड प्रदूषण निर्माण होऊन गावात वेगवेगळ्या आजारांचे प्रादुर्भाव होत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथे सुरू असलेल्या रेल्वे कोळसा सायडिंग व कोल डेपो ला स्थानिक स्वराज्य संस्थेची व प्रदूषण नियंत्रण बोर्डाची परवानगी नसल्याने त्या अनाधिकृत आहेत. या संदर्भात गेल्या 10 महिन्यापासून सातत्याने संघर्ष सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी अवैध सायडिंग हटविण्यासंदर्भात आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी मात्र गेल्या 1 महिन्यापासून झाली नाही. त्यामुळे शेवटी राजूर बचाव संघर्ष समिती चे वतीने दि. 17 ऑक्टो 22, सोमवार पासून बेमुदत आमरण उपोषण वणी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर सुरू करण्यात आले होते.


ह्या आमरण उपोषणाला दिशाताई अमृत फुलझेले, नाजूकाताई प्रशांत बहादे, वीणाताई अमर तितरे व शालूताई संजय पंधरे ह्या बसल्या आहेत. तसेच मोची, मादगी, मादीगा, मादरू महासंघाचा पाठिंबा देण्यात आला यावेळी संघाचे जेष्ठ व तडफदार समाजसेवक प्रकाश तालावार, वणी तालुका अध्यक्ष सुरज चाटे, शहर उपाध्यक्ष रवी कोमलवार, कार्याध्यक्ष नागेश मोहूर्ले, तालुका उपाध्यक्ष राकेश विठ्ठल शंकावार, बाबू कुक्कलवार, अजय कंडेवार, श्याम संगमवार, युवराज खोब्रागडे, मोरेश्वर कुंटलवार, अरुण बल्लमवार, विवेक तालावार, प्रेम कोमलवार, दिलीप अलवलवार, सुरेश पेटपर्तीवार, राजु येमुर्लेवार आदी मादगी समाजबांधव उपस्थित होते.


