माणिक कांबळे /मारेगाव:– रेती घाट लिलाव न झाल्यामुळे तालुक्यात रेती तस्करीला उधाण आले आहे.या रेती तस्करीला आळा घालण्यासाठी मंडळ अधिकरी ए. बी.घुघाने सातत्याने प्रयत्न शील आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांनी मोठया प्रमाणात धाडी घालून रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त केले आहे. त्यामुळे तालुक्यातील रेती तस्कराचे धाबे दनानले आहे. आज ता 6जुलै चे 12वाजता वेगाव शिवरातून अवैध रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर त्यांनी जप्त केले आहे.नुकतेच रुजू झालेले तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शना खाली नायब तहसीलदार यांचे पथक सक्रिय केले आहे.हे पथक रेती तस्कारांना कुठलीच भनक न लागता तस्करा वर नजर ठेवून आहेत. आज दुपारी 12वाजता
तालुक्यातील वेगांव ते मारेगाव रोड वर वाहन क्रं. एम एच 29 ए के 2388 तर ट्रॉली नं. एस ई एन एन पी 1038 डी एस एल डी हे ट्रॅक्टर एक ब्रास रेती घेऊन वाहतूक करीत असल्याचे या पथकाला आढळले,घटनेचा विलंब न करता महसूल पथकांच्या चमूने घटनास्थळी तपासणी केली. या चौकशीत ही रेती अवैध असल्याचा प्रकार उघड झाला आहे.त्यामुळे विना परवाना 100ब्रास रेती ट्रॅक्टरमधून घेऊन जाणाऱ्या या ट्रक्टर वर जप्तीची कारवाई रंगेहात करण्यात आली आहे.मंडळ अधिकारी गुघाणे यांच्या पुढाकारातुन झालेल्या या कारवाईचे तालुक्यात कौतुक होत आहे. ही रेतीची चोरी करणारे ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयाचे आवारात ठेवण्यात आले असून रेती तस्करावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
मागील बातमी देखील वाचा :-
संपादक
अजय संजय कंडेवार'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.