•L.C.B ची कारवाई.
•सराटीचा “विवेक” पोलिसांचा नजरेत खरच नव्हता?
•मारेगावात ठाणेदार सुस्त की मस्त असा दबक्या आवाजात चर्चा ?
अजय कंडेवार,वणी:- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सराटी येथे गेल्या काही महिन्यापासून अवैध दारूची विक्री सुरु असल्याची गोपनीय खबर पोलिसांना मिळाली होती.दखल घेत LCB चमुनी दि.14 डिसेंबर रोजी पहाटे धाड टाकली. या धाडीत अवैध दारू विक्रेते विवेक नरांजे यांच्या घरी साठवून ठेवलेले देशी दारूचे 180 मिली चे 672नग जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या या देशी दारूची किंमत 46 हजार 750 रुपये असून संशयितास तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.
पो.स्टे. मारेगांव हद्दीतील ग्राम सराटी येथे राहणारा इसम नामे विवेक नरांजे याने त्याचे मालकीच्या घरात अवैधरित्या विक्रीकरीता विनापरवाना दारुचा साठा करुन ठेवला आहे. अशा माहितीवरुन तात्काळ पंचासह सराटी येथे खबरेतील संशियाताचा घरी गेले असता विवेक नरहरी नरांजे (वय 39) वर्षे रा. सराटी ता.मारेगांव असे सांगीतले.घराची कायदेशीररीत्या घरझडती घेतली असता, घरातील स्वयंपाक खोलीचे बाजुला असलेल्या खोली मध्ये देशी दारुच्या रुपेश संत्रा असे लेबल असलेले एकुण 14 बॉक्स ज्यामध्ये 180 एमएल क्षमतेच्या देशी दारुच्या एकुण 672 बॉटल किंमत 46704/- रुपयाचा मुददेमाल मिळुन असुन आरोपी विरुध्द पो.स्टे. मारेगांव येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात API अतुल मोहनकर ,सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सतिश फुके,सर्व स्थानिक गुन्हे शाखा व रजनिकांत पाटील, राजु टेकाम,पोस्टे मारेगाव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.