•प्रशासन निद्राअवस्थेत: रेती तस्करांचे चांग भल.
देव येवले,झरी: तालुक्यात रेती तस्करीचा गोरखधंदा प्रशासनाच्या डोळेझाक पणामुळे जोमात सुरु आहे. प्रशासन या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याने, तस्करीचे जाळे अधिक घट्ट होत चालले. या बाबतचे अनेक प्रकार समोर येऊनही किरकोळ कार्यवाही शिवाय प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने रेती तस्करीला अभय दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
तालुका हा रेती तस्करीस नावारूपास आला आहे. महसूल विभागाकडून केलेल्या उपाय योजना कुचकामी ठरत आहे. शासनाचे करोडो रुपयाचे महसूल शुल्क बुडविले जात असले तरी, तालुक्यातील पैनगंगा, खुनी, विदर्भ या नदीच्या पात्रातून अवैध रेतीची उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. या रेती तस्कराकडे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्या दुर्लक्षित पणामुळे रेती तस्करीचे धंदे फोपावत चालले आहे.
गावा-गावात ५ हजार रुपये ब्रासप्रमाणे रेती विक्री करून महिन्याकाठी लाखो रुपये हे तस्कर कमावत आहे. नद्यांच्या पात्रात रात्रभर रेतीचा उपसा करून रेती चोरी सुरु आहे. रेती चोरी करणारयावर कार्यवाही करून दंड ठोकण्याचे आदेश असतांना सबंधित विभागाकडून कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येते.
या प्रकारातून शासनाला कोट्यावधीचा फटका बसत आहे. असे असले तरी महसूल प्रशासन मात्र या सर्व प्रकाराला घेवून अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहे. तालुक्यातील पैनगंगा, खुनी, विदर्भ, पात्रातील घाटातून रात्रीच्या वेळेस खुल्लमखुल्ला रेती चोरी केली जात आहे. त्यामुळे या रेती तस्करीविरोधात कोण कारवाही करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.