•पूरग्रस्त अल्पभूधारक शतकऱ्यांसाठी मनसेची दत्तक योजना
•वणीत ‘ भव्य शेतकरी मेळावा ‘ ……
अजय कंडेवार,वणी – जगाचा पोशिंदा डोळ्यादेखत पुराने सर्वस्व हिरावून नेल्याने हतबल झाला. पुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले पण त्याचा अहवाल तयार होईल, मग तो पुढे जाईल, तोपर्यंत जगायचं कस या विवंचनेत शेतकरी सापडला असुन त्याला कोणीही वाली उरला नसल्याचे चित्र दिसत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या तर सोडाच मुक्या जनावरांसाठीही मोठ्यप्रमाणावर चाऱ्याची व्यवस्था देखील करीत शेतकऱ्याच्या मदतीला धावली.त्यात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राज ठाकरे दत्तक योजना देखील जिल्ह्यात सुरू केली . मात्र यानंतर असे लक्षात आले की, शेतकरी दुबार पेरणी व तिबार पेरणी केली त्यातही तो आधीच अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला परतीचा पावसाने पुरते डबघाईस आणल्याने या वर्षी शेतकरी अन्नालाही मुकला आहे. मग जीवन कसे जगावे ? हा त्याच्यापुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची व्यथा मांडत असतानाही शेतकऱ्याला सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून निव्वळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जात आहे.
वणी, मारेगाव आणि झरी जामणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली. सुरुवातीला पाणी न आल्याने दुबार पेरणी तसेच तीबार पेरणी करावी लागली. तर आता झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीचा पुराने शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे. या योजनेमध्ये पुरामुळे ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना रब्बी हंगामात उभारी मिळावी, म्हणून राजू उंबरकर हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. वणी उपविभागातील जवळपास 1200 शेतकऱ्यांनी फॉर्म देखील भरले.त्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे खते कीटकनाशके, यांसह इतर शेती साहित्य शेतकऱ्यांना मोठ्यप्रमाणावर दिले जाणार आहे.
या करिता येथील वसंत जिनिंग सभागृहात 1 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.00वाजता राजूभाऊ उंबरकर राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संकल्पनेतून “भव्य शेतकरी मेळाव्याचे “आयोजन करण्यात आले आहे. नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे “पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेच्या ” माध्यमातून फॉर्म भरलेल्या 1200 शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी मोफत बियाणे व इतर साहित्य वाटप करण्यात येत आहे .तेव्हा वणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी भव्य शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा ,असे आवाहन राजूभाऊ उंबरकर (राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी केले आहे.