Ajay Kandewar,Wani:- शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी आज रविवारी वणी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला शहरातील व ग्रामीण भागातील हजारो नागरिक सहभागी झाले. टिळक चौकात रॅलीचे रुपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना संजय देरकर यांनी एकजुटीने लढू व जिंकू, अशी गर्जना दिली. रॅलीत खा. संजय देशमुख व माजी आ. वामनराव कासावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
वणी विधानसभेची निवडणुक अतिषय चुरशीची होणार असल्याचे चित्र आज दिसत आहे. प्रचार यंत्रणेच्या शेवटच्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आपली संपुर्ण ताकद पणाला लावत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना ग्रामीण भागातुन मिळत असलेला पाठिंबा उत्स्फुर्त आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस निवडणुक रिंगणात असलेल्या शिवसेना उबाठा चे उमेदवार संजय देरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे. माजी वामनराव कासावार व काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी उत्स्फूर्तपणे प्रचार यंत्रणा राबवत आहे. एकुनच महाविकास आघाडी लोकसभेची पुनरावृत्ती करणार आहे असे चित्र दिसत आहे.
यावेळी खा. संजय देशमुख, वामनराव कासावार, राजेंद्र गायकवाड, टिकाराम कोंगरे, राजीव कासावार, घनश्याम पावडे, सुनील कातकडे, संजय निखाडे, अमोल धोपेकार कुमार मोहरमपुरी, कॉम्रेड दिलीप परचाके, योगिता मोहोड, अरुणा खंडाळकर, अरविंद ठाकरे, मारोती गौरकार, गजानन किन्हेकार, दीपक कोकास, गणपत लेगांडे, जयसिंग गोहोकार, रज्जाक पठाण, विजय नगराळे, वर्षा निकम, आबिद हुसेन, इजहार शेख, अजय धोबे, असलम,राजू तुरणकर इ. प्रमुख समावेश होता.