•आजचा पाचवा दिवस.
अजय कंडेवार, वणी:- झरी तालुक्यातील अर्धवन येथे संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सप्ताह दिनांक रोज मंगळवार दि. ७-२-२०२३ ते रोज सोमवार दि.१३-२-२०२३ पर्यंत गजानन महाराज देवस्थान, अर्धवन येथे सुरू आहे.
या गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सप्ताहात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात ७-२-२०२३ रोज मंगळवार ला घट स्थापना व दीप प्रज्वलन प्रिया संजय केराम, (सरपंच ग्रामपंचाय, अर्धवन) नवनितरेड्डी शिवारेड्डी चिंतलवार, (उपसरपंच प्रा. अर्धवन) गणेश गोलपेलवार, पोलीस पाटील, अर्धवन)व गुरुदेव सेवा भजन मंडळ, अर्धवन यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सायं. गुरुदेव सेवा भजन मंडळ, अर्धवन यांचे भजन अतिशय भक्तिमय वातावरणात झाले. येणाऱ्या उरलेल्या सहा दिवसात भक्त जास्तीत जास्त या परायनांचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरूदेव भजन सेवा मंडळ यांनी केलें आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक सुभाष मदीकुंटावर, मोहन नुतपेल्लीवार, विनायक अन्नमवार, सुभाष जुमनाके, अनिल मदीकुंटावार, दिलीप पेंदोर, अशोक पार्लावार, बाजीराव चांदेकर, अशोक बोरकर, वसंता गेडाम, दामोधर भादीकर, गजानन शिरपुरकार, गजानन बोरगमवार हे सर्व आहेत.