•लहान मुले व्यसनाधीन तर महिला असुरक्षित…
सदरक्षणाय !??
•पोलिस ठाण्यात “मैं ही बडा….. “अशी स्थिती सूरु.
सुरेंद्र इखारे ,वणी – शहरात चोरट्यानी चांगलाच धुमाकूळ घालून चोरीचे सत्र सुरू असल्याने व्यापारात व महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आम नागरिकही भीतीच्या सावटात दिसत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने वणी तालुक्यातील नागरिकांचा दैनंदिन व्यवहार येथे होतो. वणी शहर हे ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जात असल्याने या ठिकाणी कोळसाचा मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याने व विविध प्रांतातील नागरिक या ठिकाणी वास्तव्याला असल्याने त्यात मोठया प्रमाणात अवैध वाहतूक, जुगार, व मोबाईल वर मटका,या अवैध धंद्यातून चोऱ्या व भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास करून पोलिसांपुढे आव्हान उभे करून सुध्दा चोरीचे सत्र सुरूच असल्याने या चोरट्यांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या धाडशी चोऱ्यातून या गुंडप्रवृत्ती बळावली आहे . त्यामुळे घर सोडताना किंवा बाजारात व्यवहार करताना जीव मुठीत घेऊन व्यवहार करावा लागत आहे या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढत्या घटनेवरून वणी शहरात चोरट्यांची टोळी व गुन्हेगारीची टोळी सक्रिय झाल्याची शंका येत आहे. कारण दिनदहाडे व तीही ग्रामीण भागातील महिलां तिच्या गळ्यातील मौल्यवान दागिन्यांवर हात मारला गेला तेव्हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस कर्तव्यावर आहे की नाही ,असा प्रश्न बाजारातील महिलांना पडत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेकडे पोलिसांचे लक्ष नाही . त्यांचे हित कशात आहे हे समजायला मार्ग नाही तेव्हा वणी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. वणी शहराच्या सुरक्षिततेसाठी वरिष्ठांनी विशेष लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.