•हा प्रकार पाहण्यास तोबा अशी गर्दी.
माणिक कांबळे,मारेगाव :-पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पिसगाव येथील एका मद्यधुंद युवकाने रिपोर्ट का घेतला नाही या कारणास्तव चक्क पोलीस स्टेशनवर दगडफेक केली असून त्या युवकाला मारेगाव पोलिसांनी अटक केली आहे.Alas…. stone pelting at the police station itself.Crowds like to see this type.
शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारात पिसगाव येथील दिनेश नामदेव आगलावे या 30 वर्षीय युवक दुपारी 3 वाजताच्या सुमारास मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. मद्यधुंद अवस्थेत असल्याने मारेगाव पोलिसांनी तक्रार दुसऱ्या दिवशी करण्यास सांगितले होते मात्र “माझी तक्रार का घेत नाही म्हणून ….त्या मद्यधुंद युवकाने पोलीसाकडे पाहून शिवीगाळ करीत पोलीस स्टेशनच्या दिशेने दगडफेक केली आहे.
संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरच दगडफेक होत असल्यामुळे बाजारासाठी जमलेल्या जमावाने हा प्रकार पाहण्यास तोबा गर्दी केली होती. अखेर हा प्रकार थांबविण्यासाठी पोलिसांनी संरक्षण पोलीस ढाल हेल्मेट चा वापर करावा लागला. युवकाला शिताफिने ताब्यात घेऊन सुरु असलेली दगडफेक थांबविली असून त्याच्यावर कलम 353,332,336, 294 तसेच कायदा 1922 नुसार कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कोड……
“पोलीस स्टेशनवर जनतेचा विश्वास आहे समाजातील लोक योग्य कारवाई होईल या विश्वासाने पोलीस स्टेशनला येतात गुन्हेगारीवर आळा घालून कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे मात्र अशा घटनेने पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न या माथेफिरू युवकांकडून करण्यात आला. या युवकावर योग्य कारवाई करण्यात येईल “. ज्ञानेश्वर गोविंद सावंत, (पोलीस उपनिरीक्षक ,मारेगाव )