•पूनवट येथील घटना.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पूनवट या गावात 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पूनवट या गावात रहिवासी अमरदीप दिलीप पाटील (वय 30) यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घरात कोणीच नसतांना घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केली. सदरचा प्रकार त्यांचे घराचाचा लक्षात आला. मयत अमरदीप दिलीप पाटील यांना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ,वैद्यकीय अधिकारीनी मृत घोषित करुन मयताचे शवविच्छेदन केले.
अमरदिप यांनी आत्महत्या का केली? यामागील कारण समजू शकले नाही. मयत अमरदीप पाटिल त्यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडील असा परिवार आहे. आई वडिलांचा एकुलता एक आधार गेल्याने परिवारावर दुःखाचे डोंगरच कोसळले.घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.अमरदीप यांचे अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.