•1 गंभीर जखमी तर दुसरा दुचाकीस्वार पसार…
•विशेष त्याच ठिकाणी आजच 3 अपघात झाल्याची धक्कादायक माहिती आली समोर….
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील कायर – मुकुटबन रस्त्यावर असलेले 18 नंबरचा पुलानजिक दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या, 1 गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे ही धडक इतकी भीषण होती की या अपघातामध्ये समोरच्या गाडीवरील असलेला संदीप पानघाटे (वय 34) रा.अडेगाव हा युवक जागेवरच बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याचा डोक्यावर जबर मार असल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातामध्ये एक गंभीर (One injured ) झाला, तर दुसरा दुचाकीवर असलेला हा पसार झाल्याची माहिती आहे.कायर -मुकुटबन मार्गावर असलेला 18 नंबर पुलाजवळ ही आजचा आजच 3 री दुर्घटना घडली. परंतू हा अपघात इतका भीषण होता की अपघात स्थळी अक्षरशः रक्ताचा सडाच पडलेला होता.
108 या क्रमांकावर कॉल केला असता 1 तास उशीर पोहोल्याची माहिती तेथील काहीं प्रथदर्शी देत आहे.सध्या त्या जखमीला अपघात स्थळवरून रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. या भीषण अपघातानं रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय…