Ajay Kandewar,Wani:- वणी विधानसभा मतदारसंघामधे सध्या निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण रिंगणात उतरलेले आहेत, परंतु गेल्या अनेक दशकांपासून या वणी मतदार संघावर कॉग्रेसचे वर्चस्व राहिलेले पहायला मिळाले आहे. याच विधानसभेत मागील अनेक वर्षापासून खाडे कुटुंबाची जनतेसोबत नाळ जुळलेल आहे. शहर ते प्रत्येक गाव, पोळ,वाडी,वस्तीवरील सामान्य जनतेच्या सुख दुःखात संजय खाडे कुटुंब आवर्जून सहभागी होतात.
जनतेसाठी तन, मन, आणि धन यामुळे त्यांची वणी मतदार संघात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कुठलाही भेद भाव न करता होईल तेवढी मदत करण्यासाठी खाडे अहोरात्र काम करत आहेत. लग्न समारंभ, अंत्यविधी, वाढदिवस तसेच ईतर कार्यक्रमात ते आवर्जुन उपस्थिती लावतात. काम करण्याची त्यांची एक वेगळीच पद्धत आहे.दवाखाना , शेतकऱ्यांना डिपी आणि ईतर कुठल्याही कामासाठी. खाडे परीवार वेळ देऊन काम करून सर्व सामान्यांच्या चेहऱ्या वर आनंद झळकवत आहेत. या मुळेच प्रत्येक गावात अभुतपुर्व स्वागत होत आहे. उमेदवार नेमका कसा असतो हे 2 वर्षाआधीच संजय खाडे यांनी वणी मतदार संघाला दाखवुन दिलेले आहे. म्हणूनच या निवडणुकीत समोर कितीही येऊ द्या “मी जनतेचा…जनता माझीच ” अशी भूमिका संजय खाडे यांची ठाम भूमिका आहे . या निवडणुकीत प्रत्येक गावात खाडे यांचे वर्चस्व नक्किच मतदानात अव्वल राहणार असल्याचे वणी मतदार संघातील जनतेतून बोलले ही जात आहे. या मतदारसंघात आमदार होतील आणि रेकॉर्ड ब्रेक निधी खेचूनही आणणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कारण लोकसभेचे चित्रं पाहता प्रतिभाताई धानोरकर यांच्यासाठी अहोरात्र एक करुन कॉर्नर बैठका घेत ताईंचा प्रचार जोमात केला आता जनतेसाठी खाडे नाव पाठच झाल्याचे चित्र विधानसभेत दिसत आहे. म्हणून मताचा टक्केवारीत खाडे मागें राहणार नाही याची चर्चाही जोरदार सूरू झाली आहे.