•काँग्रेस तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.
अजय कंडेवार,वणी – मारेगाव महामार्गावर असलेल्या गौराळा येथील चुनखडी खदानीतून निघणाऱ्या ओव्हरलोडिंग वाहनांमुळे महामार्गावर चिखल साचत आहे यामुळे ते गढूळ चिखल सुखल्यानंतर चिखलाचे रुपांतर बारीक बारीक कणात होत आहे व त्या बारीक कणाने रस्त्यावर चालणारे वाहन चालक यांच्या नाका डोळ्यात जाऊन अनेक अपघात त्या ठिकाणीं होत आहे तसेच या कारणाने अनेक निष्पापांना नाहक अपंगत्व आले आहे.परंतू त्याठिकाणी खदान प्रशासन कोणतीही उपाययोजना करतांना दिसत नाही याबाबतीत परिसरातील नागरिकांच्या समस्या काँग्रेसने लक्षात घेतले असता ,या संदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याकरीता मा.आमदार वामन कासावार यांच्या मार्गदर्शनात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम पावडे यांच्या नेतृत्वाखाली वणी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत दि.5 ऑक्टोबर रोजी गौराळा चुनखळी खदान व्यवस्थापकाला निवेदन देत उपाययोजनेकरीता 7 दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे.गौराळा येथील चुनखडी खदानीतून निघणाऱ्या ओव्हरलोडिंग वाहनांमुळे खदानीनजिक हायवेवर खूप मोठ्या प्रमाणात चिखलाचे सम्राज्य तयार झाले आहे. यातच मागिल काहीं महिन्यात अनेक निष्पापांचा बळी गेला आहे.कारण येथील चिखल सुखल्यांतर रेतीचे छोटे कण तयार होतात.यामुळें दुचाकी वाहने चालविणे देखील कठीण झाले आहे. तसेच वाहनधारकांना वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः खदानीतून निघणारे वाहनेदेखील ओव्हरलोड असतात. साधी ताडपत्री देखील वापरताना दिसत नाहीं असाही घणाघाती आरोप काँग्रेस तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे यांनी निवेदनातून केला आहे.या परिसरातील नागरिकांची समस्या लक्षात घेत येत्या सात दिवसात उपाययोजना न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे यांचा नेतृत्त्वात निवेदन देताना काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.