•उपविभागीय वाहतुक निरीक्षक अधिकारी यांना निवेदनाद्वारे साकडे
अजय कंडेवार,वणी:- वणी सायडिंग ते कोलार पिपरी चालणारे SMLT कंपनीच्या तसेच ब्राम्हणी येथील गुप्ता कोलवॉशरीत चालणाऱ्या MARL कंपनीच्या T.S. (तेलंगाना स्टेट) च्या विना T. P. (ट्रान्सपोर्ट परमिट) अश्या सर्व वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता शिवसेना शहर प्रमुख ललित लांजेवार यांनी उपविभागीय वाहतुक निरीक्षक अधिकारी यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.Otherwise…..! Shiv Sena will show style ‘Lalit’ is full of breath….!
कोलार खदान ते सायडिंग चालणारे T.S. ( तेलंगाना स्टेट) पासिंग कंपनीच्या SMLT या नावाने चालणाऱ्या कंपनीच्या सर्व वाहने व तसेच MARL कंपनीचे सर्व वाहन हे विना TP (ट्रान्सपोर्ट परमिट) चालत असून ते अवैधरित्या कायद्याचे उल्लंघन करून सर्हास पणे चालत आहे.
तरी SMLT कंपनी व MARL कंपनी या दोन्ही कंपन्यामध्ये ड्रायव्हर हे तेलंगाना स्टेट चे असून कितेक ड्रायव्हर जवळ लायसन्स सुद्धा नसून या दोन्ही कंपनीच्या बहुतांस गाड्यांचे इन्सुरन्स व फिटनेस हे सुद्धा नसल्याचे लक्षात आले आहे तरीसुद्धा या दोन्ही कंपनीच्या गाड्या बेकायदेशीर रस्त्यावर वाहतूक करत असून सहजपणे रोडवर धावतात. या अगोदर SMLT कंपनीच्या एका गाडीने अपघात झालेला आहे तरी या सर्व गाड्या बेकायदेशीर रस्त्यावर धावत आहे.
SMLT व MARL या दोन्ही कंपनीच्या सर्व गाड्यांचे प्रत्येक गाडीनुसार सर्व पेपर्स TP, ड्रायविंग लायसन्स, इन्सुरन्स, फिटनेस व अन्य सर्व पेपर्स चेक करून गाड्यांचे सर्व पेपर योग्य नसल्यास त्या गाड्याची रस्त्यावर होणारी वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला आहे.