•भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला……..!!!!!!!
•निवेदन कोणी देणार का? प्रशासन घेत असते बघ्याची भूमिका…..
अजय कंडेवार, वणी :- शहरात गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पोहोचली असून, मागील महिन्यात अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा देखील घेतला आहे. यात भटक्या; तसेच पाळीव कुत्र्यांचाही समावेश आहे.
वणी शहराचा वाढता विस्तार, कुठेही टाकला जाणारा कचरा यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या निर्माण झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या चावण्यामुळे रेबीजसारखे रोग होण्याची शक्यता आहे. कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम नगरलिकेचा कुत्रा किंवा वरह बंदोबस्त विभाग करतो. भटक्या आणि मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार आल्यास त्याची माहिती कुत्रा पकडणाऱ्या वाहनावरील आरोग्य निरीक्षकाकडे सुपूर्द करण्यात येते. परंतू वणी नगरपरिषद मुख्याधिकारी ही सुस्त असल्याचं दिसून येत आहे.रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबरोबरच नागरिकांनी हौस म्हणून पाळलेल्या कुत्र्यांनीही चावा घेतल्याने जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण 40 ते 50 नागरिकांना कुत्री चावत असल्याची खमंग चर्च आहे . शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न कधीच केले जात नाही ही तर शोकांतिकाच म्हणावे लागेल… विशेषतः शहरात निवेदन कोणी देणार का? अशी नगरपरिषद घेत असते बघ्याची भूमिका….. यांचा अर्थ असा की नगरपरिषदेचे कार्य वाऱ्यावर आणि आरोग्य विभाग कोमात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येते.
भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांकडून तक्रार आल्यास त्याची तातडीने दखल घेऊन आरोग्य निरीक्षक संबंधित भागात जाऊन भटकी कुत्री पकडून त्यांना जवळच्या केंद्रात दाखल करतात. तेथे त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याबरोबरच त्यांना अँटी रेबीज लसही दिली जाते. तीन दिवसांनंतर ज्या भागातून कुत्री पकडण्यात येतात; तेथेच त्यांना पुन्हा सोडण्यात येते. परंतु वणी नगरपरिषद आरोग्य विभाग व मुख्याधिकारी मात्र सुस्त भूमिका आणि कामचुकार प्रशासन आहे असे दिसुन येत आहे.
भटकी कुत्रे पकडून न्यावीत’…………
” शहरात चायनीज पदार्थ विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या गाड्यांवर शिल्लक राहिलेले अन्न, मांसाहारी पदार्थ रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घातले जातात. त्यामुळे या गाड्यांच्या आसपास कुत्री कायम भटकत असतात. रात्रीच्या वेळी या परिसरातून जाणाऱ्या पादचारी, वाहनचालकांच्या मागे ही कुत्री धावतात. परिणामी, अपघाताला निमंत्रण मिळते. असेच प्रकार चिकन, मटनाच्या दुकानांजवळही घडत आहेत. शहराच्या मध्यभागाबरोबरच विविध भागामध्येही हीच परिस्थिती दिसून येते. त्यामुळे नगरपालिकेने संबंधित स्टॉलधारकांना योग्य त्या सूचना द्याव्यात; तसेच भटकी कुत्रे पकडून न्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.