•नऊ दिवसही महाआरती,अष्टमीला नवचंडिका महायज्ञ हे विशेष.
अजय कंडेवार,वणी : भारतामध्ये प्रत्येक उत्सव अतिशय आनंदात साजरा करण्यात येतो नवरात्री उत्सवाला काही दिवसाने सुरवात होणार आहे. सर्वत्र मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी भक्ताची गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक भक्त आप आपल्या श्रध्देने कोणत्या ना कोणत्या मंदिरात दर्शनासाठी वेगवेगळ्या गावात मंदिरात देवीच्या दर्शनाला जातांना दिसतात. प्रत्येक भक्तांची तेथे श्रद्धा असते
तसेच आपल्या वणी शहरात आंबेडकर चौकातील नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असणारी दुर्गा माता मंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊन 25 वर्ष होत आहे. दुर्गा माता मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्या हस्ते 7/10/2021 भुमिपूजन करुन सुरू कले. अध्यक्ष रवि बेलुरकर व समितीचे सदस्यच्या संकल्पनातुन मागील दोन वर्षापासुन काम सुरु होते. अतिशय प्रसन्न व उत्कृष्ट असे भव्यदिव्य मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.येणाऱ्या नवरात्री उत्सवात मातांच्या भक्तांना दर्शनासाठी दि.15ऑक्टो. रोजी मंदिर खुले केले जाणार आहे. आणि सर्व भक्तांना नवही दिवस मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा समितीने ठरविले आहे. नवही दिवस महाआरती,अष्टमीला नवचंडिका महायज्ञ,अशा विविध कार्यक्रमांनी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे.
या नवरात्र उत्सवात वणी विभागातील भक्तांनी सहभागी होऊन दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त करावा असे आव्हान दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवि बेलुरकर, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, सचिव प्रमोद लोणारे, कोषाध्यक्ष चंदन मोहुर्ले, सदस्य नितिन बिहारी, पुरुषोत्तम मांदाडे, शिवराम आसुटकर, राजकुमार अमरवानी, अमोल बदखल, राजेंद्र जयस्वाल, सतिश कामटकर, मारोती गोखरे, स्वप्नील बिहारी, समिर लाफसेटवार, अशोक मांदाडे, नितिन मसेवार , प्रकाश दौलतकार,अमोल मनवर,मुन्ना तुगनायत, चंद्रकांत फेरवानी अशोक बतरा,विनोद मुथा, यांनी केले