• विजय पिदूरकर यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन….
सुरेंद्र इखारे,वणी – तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावे. अशा मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी नायब तहसीलदार विवेक पांडे यांना दिले आहे.
वणी तालुक्यात मागील दोन महिन्यात संततधार पाऊस झाल्याने व नदी नाल्याना पूर आल्याने शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरवडून जाऊन शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण होऊन आता शेतकरी शेतमजुरांना हाताला काम नसल्यामुळे शेतकऱ्यांचा सण बैल पोळा, दिवाळी दसरा व इतर सण कसे साजरे करायचे या विवंचनेत असल्याने मोठे आर्थिक संकट शेतकरी शेतमजुरांसमोर आवासून उभे आहे.
तेव्हा शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत कामे देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. संबंधित निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, गटविकासाधिकारी वणी यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर व समस्त गावकरी उपस्थित होते.