•शेतकऱ्यांचा वाली कोण?
•YDCC बँकेचा माजी अध्यक्षांची मागणी.
अजय कंडेवार,वणी:- वणी ,मारेगाव व झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी दिलेल्या निवेदनातून वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टी वादळी वारे सह जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तुर व ईतर पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक वाया गेल्याने वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. या विभागातील शेतकऱ्यांना न्याय देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकऱ्यांना एकरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी केली आहे.
यावेळी संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, जयसिंग गोहोकर, साधना गोहोकर,प्रा.वऱ्हाटे, प्रफुल उपरे, अरविंद बोबडे, प्रमोद वासेकर व आदि कार्यकर्ते उपस्थित होते.