•”दत्ता व बाबाराव ” अटकेत
•पण यात आणखी एक मुख्य “तो ” कोण ?
अजय कंडेवार,वणी : झरी तालुक्यातील अडेगाव गावालगत असलेल्या जंगलात कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात असल्याची माहिती दिं 12 डिसें.रोजी मिळताच मुकूटबन पोलीसांनी या ठिकाणी छापा टाकला. मात्र, पोलीसांनी कारवाई करण्याअगोदरच काहींना याची माहिती मिळाली. त्यामुळे ते जंगलात पळून गेले. पोलीसांनी घटनास्थळी 2 जणांना अटक करीत ८४ हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस ठाणे मुकूटबनचे ठाणेदार सुरेश मस्के यांना गोपनीय खबर मिळाली की अडेगाव शीवारातील टेंभरीच्या झाडाखाली काही इसम हे कोंबड्याला काती बांधुन त्याची झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा खेळ खेळवित आहे. अश्या माहितीवरून पोलीस कर्मचारी यांनी रेड केले असता,घटनास्थळावरून दत्ता विकास आसुटकर (२९) रा. बाळापूर ता. वणी व बाबाराव उध्दव गोहणे (३८) रा. अडेगाव ता. झरी जामणी हे दोघे कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावून खेळत होते. त्यावरून यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडती मध्ये रोख नगदी ३ हजार ५० रुपये व मोटर सायकल MH-34 AQ 3518 ची किंमत ८० हजार रुपये, दोन जिवंत कोंबडे किंमत १ हजार ५०० रुपये असा एकूण ८४ हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यावरून कलम १२ ( ब ) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनील सकवान, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कांबळे, संदीप कूमरे, नईम शेख यांनी केली.